स्वयंसेवी संस्थांच्या राष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने शनिवार दि.१२ डिसें.व रविवार दि.१३ डिसें. या दिवशी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, केशवसृष्टी, उत्तन येथे "कार्यकर्ता निर्माण" या विषयावर एक शिबीर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिराला मुंबई ग्राहक पंचायतीच्यावतीने खालील ४ प्रतिनिधी उपस्थित होते.
श्रीम.ज्योती वैद्य.(दादर-माहीम-वांद्रे विभाग)
श्रीम.रंजना सावंत.(अंधेरी-जोगेश्वरी विभाग)
श्रीम.मानसी नाईक.(विरार विभाग)
श्रीम.अनुराधा चिमडे.(कांदिवली विभाग)
शिबीर अत्यंत उपयुक्त,माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी होते.
Wednesday, December 30, 2009
Thursday, December 24, 2009
बदलती जीवनशैली आणि ग्राहक चळवळ
(आधार:महाराष्ट्र टाइम्स दि.२४/१२/२००९)
डॉ. रामदास गुजराथी
अध्यक्ष, मुंबई ग्राहक पंचायत
(सातत्याने विकसित होत जाणारी नवी खचिर्क जीवनशैली आपल्या देशातील नीतिमूल्यांवर घाव घालणारी आहे. कारण त्यासाठी प्रत्यक्ष उत्पन्नापेक्षा अधिक उत्पन्नाचे स्रोत निर्माण करावे लागतात आणि अशा स्रोतांच्या शोधासाठी भ्रष्टाचाराच्या मार्गांचा कळत न कळत अवलंब करावा लागतो. अशी माणसं ग्राहक चळवळीला कोणता आधार देणार? आजच्या भारतीय ग्राहक दिनानिमित्त या आव्हानाचा परामर्श... )
जागतिकीकरणाच्या लाटेने केवळ आपल्या अर्थव्यवस्थेवरच परिणाम केला नसून आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनावर देखील दूरगामी परिणाम केला आहे. आज आपण 'भारतीय नागरिक' म्हणून नव्हे तर 'जागतिक नागरिक' म्हणून जीवन जगणे अधिक पसंत करू लागलो आहोत. परिणामी आपल्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल झालेला दिसून येतो. नाविन्याची ओढ एकसारखी वाढत आहे.
आपली जीवनशैली बदलली म्हणजे नेमके काय घडले? या प्रश्नाचे उत्तर विस्ताराने देता येईल. परंतु काही वैशिष्ट्यपूर्ण बदलांचाच येथे मी विचार करणार आहे. ग्राहक चळवळीतील एक कार्यकर्ता म्हणून हे बदल मला प्रकर्षाने जाणवतात आणि भिववितात देखील.
गेल्या २०-२५ वर्षांत 'आहेरे' (Haves) आणि 'नाहीरे' (Have nots) मधील अंतर भरमसाठ वाढले आहे. तंत्रज्ञानाधिष्ठित समाजात ज्ञानाचे महत्त्व वाढल्यामुळे 'आहेरे' वर्गाच्या उत्पन्नात भरमसाठ वाढ झाली असून त्यांच्याकडे आवश्यकतेपेक्षा अधिक पैसा येत आहे. आज आपण आपल्या देशात तीन लाखांपासून ६८-७० लाखांच्या दरवषीर्च्या पॅकेजेसची भाषा बोलू लागलो आहोत. काही हजारांत उत्पन्न कमावले, त्यांच्या घरात आता लाखाने उत्पन्न येऊ लागले. स्वाभाविकपणे या लोकांची जीवन जगण्यासंबंधीची 'अभिप्सा' बदलली. त्यांना सर्व उत्तम दर्जाच्या आणि आकर्षक अशा गोष्टींचे आकर्षण वाटू लागले. महागड्या गोष्टींकडे कल वाढला. जगाला भेडसावणाऱ्या महागाईविषयी त्यांची तक्रार नाही. कारण त्यांना अधिक खर्च करणे शक्य आहे. म्हणून ते साध्या दुकानात न जाता मॉल्सच्या वाटेने जाऊ लागले आहेत. या ग्राहकवर्गाने 'महागड्या जीवनशैलीचा' मनापासून स्वीकार केलेला दिसून येतो. क्वालिटी महत्त्वाची, किंमत दुय्यम.
अलीकडच्या आधुनिक कुटुंबात दोन गोष्टींचा शिरकाव झालेला दिसून येतो. त्या म्हणजे, प्रत्येक गोष्टीसाठी 'होम डिलिव्हरी' आणि 'किचनलेस फॅमिली'. या दोन्ही गोष्टी बदलत्या जीवनशैलीची खास वैशिष्ट्ये आहेत. किराणा माल मागवायचाय? करा दुकानदाराला फोन आणि द्या ऑर्डर. या फोनवरील मागणीला पूर्ण करणारी 'होम डिलिव्हरी' आजची जीवनशैली बनू पाहत आहे.
त्याचवेळी मुंबई-पुणे-अहमदाबाद अशा काही शहरांत 'किचनलेस होम' ही संकल्पना रूढ होत असताना दिसत आहे. तरुण जोडप्यांनी तिचा अवलंब करायला सुरुवात केली आहे. सकाळी ८ ते रात्री १० पर्यंत घराबाहेर असलेल्या या तरुण जोडप्यांना 'किचन'ची आवश्यकताच भासत नाही. सकाळचा चहा-नास्ता बाहेर. दुपारचे जेवण ऑफिसच्या कँटिनमध्ये आणि रात्रीचे घरी परतताना चांगल्या हॉटेलमध्ये. ही जीवनशैली विकसित होत गेल्यावर घर हे विश्रामगृह बनेल आणि 'आमच्या घरी जेवायला या' या वाक्याची सामाजिक जीवनातून हकालपट्टी होईल.
यातूनच 'युज अँड थ्रो कल्चर' (वापरा आणि फेका संस्कृती) उभे राहत असल्याचे दिसून येते. कोणतीही वस्तू फार काळ वापरायची नाही किंवा घरात ठेवायची नाही. वस्तू वापरायची आणि तिची अल्पकाळातच विल्हेवाट लावायची हे या कल्चरचे वैशिष्ट्य. माझ्या आईचे लग्न १९व्या वर्षी झाले, पण वयाच्या ५०व्या वर्षापर्यंत लग्नातील शालू तिच्याजवळ होता. तिला त्याचा अभिमानही वाटे. पण आता कोणतीही वस्तू लवकर 'रिप्लेस' करण्याची प्रवृत्ती वाढत आहे.
२०-२५ वर्षांपूवीर् प्रत्येक घरात टेलिफोन होता अशी स्थिती नव्हती. पण कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीने क्रांती घडवून आणली असून आज 'मोबाईल' हे एक खेळणे झाल्यासारखे वाटते. माध्यमिक शाळेत जाणाऱ्या मुलामुलींपासून वयाची पंचाहत्तरी पूर्ण केलेल्या व्यक्तीच्या हाती मोबाईल दिसून येतो. मोबाईलशिवाय अनेकांचे काम अडते. इतका मोबाईल आपल्या आजच्या जीवनात अविभाज्य झाला आहे. नाशिकला ११० मोबाईल टॉवर्सना सील ठोकले, तर लाखाच्यावर मोबाईल बंद पडले. सर्व ग्राहक जाहीर तक्रार करू लागले. ही स्थिती सर्व भारतभर आहे.
अशा या बदलत्या जीवनशैलीचा देशातील ग्राहक चळवळीवर काय परिणाम होणार हा खरा चिंतेचा प्रश्न आहे. उपभोगप्रधान समाजातील ग्राहक देशातील ग्राहक चळवळीला उपयुक्त ठरतील का, हा खरा सवाल आहे. अशा उच्चभ्रू समाजातील लोकांना ग्राहक चळवळीची आवश्यकता वाटेल का? असे ग्राहक सहजरीत्या संघटित होतील का? पैशाच्या जोरावर ते सर्व प्रकारचे सुख उपभोगू शकतात. त्यांना ग्राहक चळवळ आवश्यक वाटेल का? अशा ग्राहकांचे प्रश्न सामान्य ग्राहकांच्या, गरीब ग्राहकांच्या प्रश्नांपेक्षा भिन्न असणार यात शंका नाही. इंटरनेटच्या जमान्यात वावरणारे हे सुशिक्षित आणि उच्च मध्यम वर्गातील ग्राहक एकत्र येऊन ग्राहक चळवळ समर्थ करण्यास किती उपयुक्त ठरतील, याविषयी मी साशंक आहे. म्हणून इंटरनेटच्या युगातील ग्राहक चळवळीसंबंधी गंभीरपणे विचार करण्याची आवश्यकता ग्राहक संघटनांपुढे निर्माण झाली आहे.
आजच्या तरुण ग्राहकांच्या उपभोगविषयक सवयी अत्यंत 'खचिर्क' होत चालल्या आहेत. याचाच अर्थ त्यांच्याकडून टिकावू (sustainable) जीवनशैलीचा अव्हेर होत आहे. भारतीय समाजात टिकावू जीवनपद्धतीचा शतकानुशतके अवलंब केला गेला पण गेल्या २०-२५ वर्षांत विचित्र चित्र निर्माण होत असल्याचे दिसते. उपभोगावर संयम ठेवणे आवश्यक आहे याची जाणीव करून द्यायला हवी आहे, कारण कर्ज काढून उपभोग घेण्याची वृत्ती वाढत आहे. पूवीर्चा अशिक्षित ग्राहक कर्ज काढून थाटात मुलीचे लग्न करायचा आणि व्यापारी आणि सावकाराकडून लुबाडला जायचा. तशीच परिस्थिती या सुशिक्षित केडिट कार्ड अथवा डेबिट कार्ड धारकांची होत आहे. ग्राहक चळवळीपुढे हे एक वेगळेच आव्हान आहे.
सातत्याने विकसित होत जाणारी ही नवी जीवनशैली आपल्या देशातील नीतिमूल्यांवर घाव घालणारी आहे. कारण खचिर्क जीवनशैली जगण्यासाठी प्रत्यक्ष उत्पन्नापेक्षा अधिक उत्पन्नाचे सोत निर्माण करावे लागतात आणि अशा सोतांच्या शोधासाठी भ्रष्टाचाराच्या मार्गावर कळत न कळत चालत जावे लागते. नंतर तो मार्ग स्वीकारला जातो. आज अशी माणसे या नवीन जीवनशैलीचा यथेच्छ उपभोग घेताना दिसत आहेत. अशी माणसं ग्राहक चळवळीला कोणता आधार देणार? आणि ग्राहक चळवळ 'अशा' ग्राहकांच्या आधारावर का चालवायची याचाही विचार करावा लागणार.
पुढील दहा वर्षांत जीवनशैली अशीच वेगाने बदलत गेली तर ग्राहक चळवळ ही 'कागदावरील चळवळ' या स्वरूपात राहील किंवा समाजातील केवळ उपेक्षित ग्राहकांसाठीच राबविली जाईल आणि शेवटी इतर चळवळींचे जे झाले, तेच ग्राहक चळवळीचेही होईल. भक्कम आधाराशिवाय कोणतीच चळवळ उभी राहू शकत नाही आणि तिची वाढही होऊ शकत नाही. अशा भक्कम आधाराचा शोध घेण्याचे आव्हानात्मक काम ग्राहक संघटनांना या पुढील काळात करावे लागणार आहे.

Wednesday, December 9, 2009
विभागीय प्रशिक्षण शिबिर (बोरिवली-दहिसर)
॥श्री:॥
॥ग्राहक हिताय, ग्राहक सुखाय॥
मुंबई ग्राहक पंचायत
विभागीय कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण शिबिर.
स्थान: दहिसर सदनिका.
शनिवार दि.१२ डिसेंबर २००९
स. ९.३० ते १०.००........नांवनोंदणी व चहा/कॅ।फी.
स. १०.०० ते ११.१५.......मुंबई ग्राहक पंचायतीची माहिती........श्री. भालचंद्र नाईक.
स. ११.१५ ते ११.३०.......विश्रांती.
स. ११.३० ते १२.४५.......मुं.ग्रा.पं.मधील वाटपाचे स्थान........श्री. कमलाकर पेंडसे.
दु. १२.४५ ते १.४५........भोजन व विश्रांती.
दु. १.४५ ते ३.००.........तक्रार मार्गदर्शन कसे करावे?..........श्रीम. वनमाला मंजुरे.
दु. ३.०० ते ३.१५.........चहा/कॅ।फी.
दु. ३.१५ ते ४.३०.........मुं.ग्रा.पं.ची प्रकाशने...............श्रीम. वसुंधरा देवधर.
रविवार दि.१३ डिसेंबर २००९
स. १०.०० ते ११.१५.......मुं.ग्रा.पं,चे ग्राहक चळवळीतील योगदान..श्री. शिरीष देशपांडे.
स. ११.१५ ते ११.३०.......चहा/कॅ।फी.
स. ११.३० ते १२.४५.......ग्राहक चळवळीपुढील आव्हाने............डॅ।. रामदास गुजराथी.

दु. १.४५ ते ३.००.........अन्य ग्राहक संस्थांची माहिती...........श्री. अशोक रावत.
दु. ३.०० ते ३.१५.........चहा/कॅ।फी.
दु. ३.१५ ते ४.३०.........आता मला काय करता येईल?..........श्री. विवेक पत्की.
दु. ४.३० ते ४.४५.........समारोप.

Tuesday, October 20, 2009
मुंबई ग्राहक पंचायतीचे नवीन पदाधिकारी (२००९).
मुंबई ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष: डा.रामदास गुजराथी.
उपाध्यक्ष: श्री.विवेक पत्की.
कार्याध्यक्ष: Ad.शिरीष देशपांडे
कार्योपाध्यक्ष: श्री.सुभाष गंद्रे
कार्योपाध्यक्ष: श्री.भालचंद्र नाईक.
कार्यवाह: श्रीम.सविता दोंदे
कार्यवाह: श्रीम.ज्योती मोडक.
खजिनदार: श्री.शशिकांत साळवी.
संदर्भ: मुं.ग्रा.पं.च्या नवीन कार्यकारिणीची दि २९/०९/२००९ची सभा.

Wednesday, August 5, 2009
Annual General Body Meeting of MGP
The Annual General Body meeting of Mumbai Grahak Panchayat will be held on
Sunday20/09/2009
at Ground Floor,Ruparel College,Matunga(W),Mumbai.

Sunday, May 10, 2009
ओंकार ग्राहक संघ-- नवीन संघप्रमुखांची नियुक्ती
शुक्रवार दि.७ एप्रिल २००९ या दिवशी ओंकार ग्राहक संघाच्या बैठकीत श्री.भालचंद्र नाईक यांची संघप्रमुख म्हणून सर्वानुमते नियुक्ती करण्यांत आली. कामाच्या सोयीसाठी संघाचे कार्यवाह म्हणून श्री.अविनाश लिमये व संघाचे खजिनदार म्हणून श्री.शेखर बनवडीकर यांनी काम पहावे असे ठरले.सर्वांनी आपआपल्या जवाबदाऱ्या स्वीकारल्या. त्या सर्वांचे उपस्थितांनी अभिनंदन केले.
नवीन कार्याध्यक्षांची व सहकार्यवाहांची नियुक्ती
मुंबई ग्राहक पंचायत गिरगांव विभागाच्या कार्याध्यक्षपदी श्री. अभय दातार यांची नियुक्ती बुधवार १५ एप्रिल २००९ या दिवशी आर्यन शाळेत भरलेल्या विभागाच्या साप्ताहिक सभेत सर्वानुमते करण्यांत आली.
श्री.अभय दातार यांनी पदग्रहण केले आणि अध्यक्षपदाची सूत्रे श्री.भालचंद्र नाईक यांच्याकडून स्वीकारली.
श्री.अभय दातार यांचे अभिनंदन!
त्याच दिवशी श्रीम.सविता चवाथे यांची सहकार्यवाह म्हणून नेमणूक करण्यांत आली. त्या विद्यमान कार्यवाह श्रीम.शकुंतला म्हात्रे यांच्याबरोबर विभागाचे काम करतील. श्रीम.चवाथे यांनी जवाबदारी स्वीकारली.
श्रीम.सविता चवाथे यांचे अभिनंदन!

Thursday, March 26, 2009
मासिकपत्रक एप्रिल २००९
॥श्री:॥
॥ ग्राहक हिताय ग्राहक सुखाय ॥ मासिक पत्रक एप्रिल २००९
मुंबई ग्राहक पंचायत
(गिरगांव विभाग)
ग्राहक बंधु-भगिनींनो,
सप्रेम नमस्कार.
• हिंदु नववर्षाच्या सर्वांना शुभेच्छा !
• व्याख्यान: बुधवार दि. १८ मार्च २००९ या दिवशी संध्या. ६.३० ते ८.०० या वेळांत आर्यन शाळेत श्री. पुरुषोत्तम दत्तात्रय काळे यांचे “सोन्याचांदीची खरेदी आणि ग्राहक” या विषयावर व्याख्यान झाले. ते उद्बोधक आणि माहितीपूर्ण होते. सोन्याचांदीची खरेदी करतांना कोणती काळजी घ्यावी हे त्यांनी रंजकतेने चांगले सांगितले. उपस्थिती २१ होती.
• व्याख्यान: बुधवार दि. १५ एप्रिल २००९ या दिवशी संध्या. ६.३० ते ८.०० या वेळांत आर्यन शाळेत डॉ. उल्हास गानू यांचे “जन औषधी योजना आणि ग्राहकहित” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. आपल्या मित्रमंडळींसह सर्वांनी अवश्य उपस्थित राहावे, ही विनंती.
• नवीन ग्राहक संघाचे स्वागत: मार्च २००९ पासून वाटपांत सहभागी झालेल्या “लालबागचा राजा” या नवीन ग्राहक संघाचे मन:पूर्वक स्वागत ! संघस्थापनेच्या बैठकीला श्री. भालचंद्र नाईक आणि श्री. अभय दातार यांनी संबोधित केले.
• जागतिक ग्राहकहक्क दिनानिमित्त ग्राहक भवन येथे झालेल्या कार्यक्रमास व इतर विभागांच्या मेळाव्यांना विभागाच्या वतीने श्रीम.शकुंतला म्हात्रे व श्रीम. नीलिमा नाईक उपस्थित राहिल्या.
• विभागाच्या साप्ताहिक बैठका नियमित झाल्या. गेल्या महिन्यांत कक्षात ४ तक्रारींना मार्गदर्शन करण्यात आले.
• सवलत योजना: आपल्या विभागांतील १७वी सवलत योजना जाहीर करतांना आनंद होत आहे. निरनिराळ्या स्वादाची आणि वेगवेगळ्या आकाराची सुकामेवा, खजूर, डेसिकेटेड कोकोनटयुक्त चॉकलेटस व संपूर्ण तेलविरहित टोमॅटो चटणी मिळेल. मागणी १ ते २० तारखेपर्यंत व वितरण २५ तारखेला श्री. रवींद्र सहस्रबुद्धे यांच्या घरून होईल. कृपया लाभ घेऊन अभिप्राय कळवावा. (संपर्क: २३८७२०६६)
• आपल्या विभागाच्या १६व्या सवलत योजनेला (नाश्त्याचे पौष्टिक पदार्थ) मार्च महिन्यांत चांगला प्रतिसाद मिळाला. रु. १९८२ ची मागणी आली. धन्यवाद इतरांनीही लाभ घ्यावा, ही विनंती.
• दरवर्षीप्रमाणे यावर्षीही होणाऱ्या आंबा वाटपाविषयी दि.१० एप्रिलला चौकशी करावी. (संपर्क: २३८७२०६६)
आपले नम्र
श्री. भालचंद्र नाईक. श्रीमती शकुंतला म्हात्रे.
कार्याध्यक्ष. कार्यवाह.
(दूरध्वनी: २३८६९२६०) (दूरध्वनी:२३८८८१८०)
आपल्या संकेतस्थळाला भेट द्या: http://mgpgirgaon.blogspot.com
प्रत-अ) अध्यक्षा सौ. वसुंधरा पेंडसे-नाईक. आ) ग्राहक संघ प्रमुख______________ इ) सहयोगी सदस्य________

Thursday, February 26, 2009
मासिक पत्रक मार्च २००९
॥श्री:॥
॥ ग्राहक हिताय ग्राहक सुखाय ॥ मासिक पत्रक मार्च २००९
मुंबई ग्राहक पंचायत
(गिरगांव विभाग)
ग्राहक बंधु-भगिनींनो,
सप्रेम नमस्कार.
• विभागीय मेळावा: रविवार दि. ८ फेब्रु. २००९ या दिवशी दुपारी ४.३० ते ७.३० या वेळात गिरगांव विभागांतील सर्व संघसदस्यांचा वार्षिक मेळावा स्वस्तिक लीग सभागृह, वि.प.रोड (दोन हत्तीजवळ) येथे झाला. प्रमुख पाहुणे श्री. चंद्रशेखर कुलकर्णी यांनी आपण सजग ग्राहक कसे असले पाहिजे हे अनेक उदाहरणे देऊन सांगितले. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्यावेळी अतुलनीय शौर्य दाखविणाऱ्या राष्ट्रपतिपदक विजेत्या चमूतील श्री. संजय गोविलकर, श्री. हेमंत बावधनकर आणि श्री. भास्कर कदम यांना मेळाव्यासाठी विशेष आमंत्रित केले होते. उपस्थित श्री. बावधनकर व श्री. कदम यांचा विभागाच्यावतीने अध्यक्षा सौ.वसुंधरा पेंडसे-नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यांत आला. अध्यक्षीय मार्गदर्शनानंतर कु. मीनल साठे यांचे कवितावाचन व “रंग कवितेचे” हा श्री.लळित यांचा बहारदार कार्यक्रम झाला. सौ.स्मिता घारपुरे यांच्या पसायदानगायनाने कार्यक्रमाची सांगता झाली. सर्व कार्यकर्त्यांचे मन:पूर्वक आभार.
• व्याख्यान: बुधवार दि. १८ फेब्रुवारी २००९ या दिवशी संध्या. ६.३० ते ८.०० या वेळांत आर्यन शाळेत “शेअरबाजार आणि ग्राहक” या विषयावर श्री.चवाथे यांचे व्याख्यान झाले. सट्टेबाजीमुळे भाववाढ कशी होते हे त्यांनी आपल्या भाषणांत सांगितले. व्यवहारसमाप्तीच्यावेळी प्रत्यक्ष वस्तूंची उपलब्धता कायद्याने अनिवार्य केल्यास नसलेल्या वस्तूंवर सट्टा खेळता येणार नाही व सट्टाबाजांच्यामुळे होणारी भावांतील चढ उतार टळेल; म्हणून ग्राहकहितासाठी मुंबई ग्राहक पंचायतीने प्रयत्न करावेत असे त्यांनी सुचविले.
• व्याख्यान: बुधवार दि. १८ मार्च २००९ या दिवशी संध्या. ६.३० ते ८.०० या वेळांत आर्यन शाळेत श्री. पुरुषोत्तम दत्तात्रय काळे यांचे “सोन्याचांदीची खरेदी आणि ग्राहक” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. आपल्या मित्रमंडळींसह सर्वांनी अवश्य उपस्थित राहावे, ही विनंती.
• विभागाच्या साप्ताहिक बैठका नियमित झाल्या. गेल्या महिन्यांत कक्षात ६ तक्रारींना मार्गदर्शन करण्यात आले.
• आपल्या विभागाच्या १६व्या सवलत योजनेविषयी- नाश्त्याचे पौष्टिक पदार्थ श्री. रवींद्र सहस्रबुद्धे (२३८७२०६६) यांच्याशी संपर्क साधावा व लाभ घ्यावा, ही विनंती.
आपले नम्र
श्री. भालचंद्र नाईक. श्रीमती शकुंतला म्हात्रे.
कार्याध्यक्ष. कार्यवाह.
(दूरध्वनी: २३८६९२६०) (दूरध्वनी:२३८८८१८०)
आपल्या संकेतस्थळाला भेट द्या: http://mgpgirgaon.blogspot.com
प्रत-अ) अध्यक्षा सौ. वसुंधरा पेंडसे-नाईक.
आ) ग्राहक संघ प्रमुख__________________
इ) सहयोगी सदस्य___________________

Sunday, February 8, 2009
गिरगांव विभागाचा १९वा वार्षिक मॆळावा

॥श्री:॥
मुंबई ग्राहक पंचायत
(गिरगांव विभाग)
मुंबई ग्राहक पंचायतीच्या गिरगांव विभागाचा १९वा वार्षिक मॆळावा रविवार दि. ८ फेब्रुवारी २००९ या दिवशी दु. ४.३०ते ७.१० या वेळांत स्वस्तिक लीग सभागृह, गिरगांव येथे श्रीम. वसुंधरा पेंडसे नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झाला.
या मेळाव्यास सुमारे १०० सदस्य उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे म्हणून लोकसत्ताचे उप निवासी संपादक श्री. चंद्रशेखर कुलकर्णी उपस्थित होते.

२६ नोव्हेंबर २००८ या दिवशी झालेल्या दहशती हल्याच्या वेळी अतुलनीय शौर्य दाखविणाऱ्या चमूतील राष्ट्रपती पदक विजेत्या तीन वीरांना या मेळाव्यास विशेष आमंत्रित केले होते. त्यापैकी श्री. संजय गोविलकर राष्ट्रपतींच्या मुंबईतील कार्यक्रमास उपस्थित राहणे आवश्यक असल्यामुळे या समारंभाला उपस्थित राहू शकले नाहीत. श्री. हेमंत बावधनकर व श्री. भास्कर कदम उपस्थित होते त्यांचा विभागाच्यावतीने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमापूर्वी शहीदांना आणि विभागातील दिवंगत कार्यकर्त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

प्रमुख पाहुणे श्री.चंद्रशेखर कुलकर्णी यांच्या हस्ते गणेशपूजन आणि दीपप्रज्वलन झाल्यानंतर श्रीमती स्मिता घारपुरे यांच्या ईशस्तवनाने कार्यक्रमाला सुरुचात झाली.
श्रीमती सविता चवाथे यांनी सूत्रसंचालन केले.
कु.मीनल साठे यांनी कवितावाचन केले.

त्यानंतर “रंग कवितेचे” हा बहारदार कार्यक्रम श्री.लळित यांनी सादर केला.
श्री. अभय दातार यांनी संबंधितांचे आभार मानले.
Tuesday, January 27, 2009
ग्राहक सभासदांद्वारे मिळणाऱ्या सेवा
मुंबई ग्राहक पंचायत (गिरगांव विभाग)
ग्राहक सभासदाद्वारे मिळणाऱ्या विशिष्ट सेवा (रास्त दराने / विनामूल्य)
अनुक्रमांक सेवेचा प्रकार सभासदाचे नांव संघाचे नांव संपर्क क्रमांक
१ इलेक्ट्रिशियन श्री. अरुण जोशी निर्मिती २३८०१६०१
२ इलेक्ट्रिशियन श्री. शरद वा. शानभाग निर्मिती ९३२१२२०२८९
३ डेबिट/क्रेडिट कार्ड तक्रारी मार्गदर्शन श्री. अभय दातार निर्मिती २३८७०७६८
४ मोबाईल रिपेअरिंग सौ.वृषाली नाईक ओंकार २३८६९२६०
५ रक्ताच्या उपलब्धतेविषयी मार्गदर्शन श्री.अनिल शहा दुग्धशाळा वसाहत २४९६६४२४
६ थॅलेसेमिया आजाराविषयी व्याख्यान श्री.अनिल शहा दुग्धशाळा वसाहत २४९६६४२४
७ डेअरी दर्शन सवलतीच्या दरात श्री.एस.आर.पाटील दुग्धशाळा वसाहत ९८६९५६६४५१
८ सोने-चांदीच्या खरेदीसंबंधी तक्रारी मे.विष्णू सखाराम ज्वेलर्स ताराबाग शुक्रवारखेरीज२३८८४३३६
९ तक्रारीसंबंधात डॉ.सुरेश तोरणे सहयोगी सदस्य आर्यन शाळा बुधवारी ६.३०
१० वीजेच्या देयकाबाबत श्री.प्रभाकर नॆने ताराबाग आर्यन शाळा बुधवारी ६.३०
११ को.ऑ.सोसायटी-बिल्डर करारासंबंधी श्री.रवींद्र सहस्रबुद्धे ताराबाग आर्यन शाळा बुधवारी ६.३०
१२ नगरपालिकेसंबंधी श्री.रॉय नाना चौक आर्यन शाळा बुधवारी ६.३०
१३ गुंतवणुकीसंबंधी तक्रारी श्री.चवाथे खोताची वाडी आर्यन शाळा बुधवारी ६.३०
अनुक्रमांक ३,५,६,८,९,१०,११,१२,१३ मार्गदर्शन सेवा विनामूल्य आहेत.

मासिक पत्रक फेब्रुवारी २००९
॥श्री:॥
॥ ग्राहक हिताय ग्राहक सुखाय ॥ मासिक पत्रक फेब्रुवारी २००९
मुंबई ग्राहक पंचायत
(गिरगांव विभाग)
ग्राहक बंधु-भगिनींनो,
सप्रेम नमस्कार.
• व्याख्यान: नियोजित वक्ते घरगुती अडचणींमुळे येऊं न शकल्यामुळे बुधवार दि. २१/०१/२००९ या दिवशी संध्या. ६.३० ते ८.०० या वेळांत आर्यन शाळा येथे ““रुग्णसेवा आणि ग्राहक” या विषयावर श्री. प्रभाकर नेने यांनी दिलेल्या मसुद्याच्या आधारे उपस्थित सभासदांनी चर्चा केली.
• संघप्रमुख शिबिर : रविवार दि. ११ जाने.२००९ या दिवशी दुपारी ३.३० ते ७.०० या वेळात गिरगांव विभागांतील संघप्रमुखांचे शिबिर स्वस्तिक लीग येथे झाले. या शिबिराला विभागीय अध्यक्ष सौ. वसुंधरा पेंडसे-नाईक उपस्थित होत्या. संघप्रमुख,संघसदस्य आणि अन्य मिळून ३५ उपस्थिती होती. या सभेला श्री. कमलाकर पेंडसे, सौ. वसुंधरा देवधर, सौ.कविता कुलकर्णी व सौ.नीलिमा नाईक यांनी संबोधित केले.
• व्याख्यान: बुधवार दि. १८ फेब्रुवारी २००९ या दिवशी संध्या. ६.३० ते ८.०० या वेळांत आर्यन शाळेत “शेअरबाजार आणि ग्राहक” या विषयावर श्री.चवाथे यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. आपण सर्वांनी मित्रमंडळींसह अवश्य उपस्थित रहावे.
• विभागीय मेळावा: रविवार दि. ८ फेब्रु. २००९ या दिवशी दुपारी ४.३० ते ७.३० या वेळात गिरगांव विभागांतील सर्व संघसदस्यांचा वार्षिक मेळावा स्वस्तिक लीग सभागृह, वि.प.रोड (दोन हत्तीजवळ) येथे होणार आहे. बऱ्याच संघांनी शुल्क पाठविले आहे; त्यांचे मन:पूर्वक आभार. ज्यांनी अजून पाठविले नसेल त्यांनी कृपया प्रति सदस्य शुल्क रु. १५ गोळा करून संघश: श्री. सहस्रबुद्धे यांना फेब्रुवारीच्या बिलाच्यावेळी द्यावेत व कार्यक्रम यशस्वी करण्यास विभागाला मदत करावी.
• विभागाच्या साप्ताहिक बैठका नियमित झाल्या. गेल्या महिन्यांत कक्षात आलेल्या ग्राहकांना तक्रारीसंबंधात मार्गदर्शन करण्यांत आले. कक्षांत काम करू इच्छिणाऱ्यांनी कृपया संपर्क साधावा ही विनंती.
• या मासिक पत्रकाबरोबर मेळाव्याचे आमंत्रण, वार्षिक ताळेबंद आणि विशिष्ट सेवा माहितीपत्रक पाठवीत आहोत. कृपया आपल्या संघांतील सर्व सदस्यांना त्यासंबंधी माहिती द्यावी.
आपले नम्र
श्री. भालचंद्र नाईक. श्रीमती शकुंतला म्हात्रे.
कार्याध्यक्ष. कार्यवाह.
(दूरध्वनी: २३८६९२६०) (दूरध्वनी:२३८८८१८०)
आपल्या संकेतस्थळाला भेट द्या: http://mgpgirgaon.blogspot.com
प्रत-अ) अध्यक्षा सौ. वसुंधरा पेंडसे-नाईक.
आ) ग्राहक संघ प्रमुख__________________
इ) सहयोगी सदस्य___________________
॥ ग्राहक हिताय ग्राहक सुखाय ॥ मासिक पत्रक फेब्रुवारी २००९
मुंबई ग्राहक पंचायत
(गिरगांव विभाग)
ग्राहक बंधु-भगिनींनो,
सप्रेम नमस्कार.
• व्याख्यान: नियोजित वक्ते घरगुती अडचणींमुळे येऊं न शकल्यामुळे बुधवार दि. २१/०१/२००९ या दिवशी संध्या. ६.३० ते ८.०० या वेळांत आर्यन शाळा येथे ““रुग्णसेवा आणि ग्राहक” या विषयावर श्री. प्रभाकर नेने यांनी दिलेल्या मसुद्याच्या आधारे उपस्थित सभासदांनी चर्चा केली.
• संघप्रमुख शिबिर : रविवार दि. ११ जाने.२००९ या दिवशी दुपारी ३.३० ते ७.०० या वेळात गिरगांव विभागांतील संघप्रमुखांचे शिबिर स्वस्तिक लीग येथे झाले. या शिबिराला विभागीय अध्यक्ष सौ. वसुंधरा पेंडसे-नाईक उपस्थित होत्या. संघप्रमुख,संघसदस्य आणि अन्य मिळून ३५ उपस्थिती होती. या सभेला श्री. कमलाकर पेंडसे, सौ. वसुंधरा देवधर, सौ.कविता कुलकर्णी व सौ.नीलिमा नाईक यांनी संबोधित केले.
• व्याख्यान: बुधवार दि. १८ फेब्रुवारी २००९ या दिवशी संध्या. ६.३० ते ८.०० या वेळांत आर्यन शाळेत “शेअरबाजार आणि ग्राहक” या विषयावर श्री.चवाथे यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. आपण सर्वांनी मित्रमंडळींसह अवश्य उपस्थित रहावे.
• विभागीय मेळावा: रविवार दि. ८ फेब्रु. २००९ या दिवशी दुपारी ४.३० ते ७.३० या वेळात गिरगांव विभागांतील सर्व संघसदस्यांचा वार्षिक मेळावा स्वस्तिक लीग सभागृह, वि.प.रोड (दोन हत्तीजवळ) येथे होणार आहे. बऱ्याच संघांनी शुल्क पाठविले आहे; त्यांचे मन:पूर्वक आभार. ज्यांनी अजून पाठविले नसेल त्यांनी कृपया प्रति सदस्य शुल्क रु. १५ गोळा करून संघश: श्री. सहस्रबुद्धे यांना फेब्रुवारीच्या बिलाच्यावेळी द्यावेत व कार्यक्रम यशस्वी करण्यास विभागाला मदत करावी.
• विभागाच्या साप्ताहिक बैठका नियमित झाल्या. गेल्या महिन्यांत कक्षात आलेल्या ग्राहकांना तक्रारीसंबंधात मार्गदर्शन करण्यांत आले. कक्षांत काम करू इच्छिणाऱ्यांनी कृपया संपर्क साधावा ही विनंती.
• या मासिक पत्रकाबरोबर मेळाव्याचे आमंत्रण, वार्षिक ताळेबंद आणि विशिष्ट सेवा माहितीपत्रक पाठवीत आहोत. कृपया आपल्या संघांतील सर्व सदस्यांना त्यासंबंधी माहिती द्यावी.
आपले नम्र
श्री. भालचंद्र नाईक. श्रीमती शकुंतला म्हात्रे.
कार्याध्यक्ष. कार्यवाह.
(दूरध्वनी: २३८६९२६०) (दूरध्वनी:२३८८८१८०)
आपल्या संकेतस्थळाला भेट द्या: http://mgpgirgaon.blogspot.com
प्रत-अ) अध्यक्षा सौ. वसुंधरा पेंडसे-नाईक.
आ) ग्राहक संघ प्रमुख__________________
इ) सहयोगी सदस्य___________________
Monday, January 12, 2009
निमंत्रण गिरगांव मेळावा
॥श्री:॥
॥ग्राहक हिताय ग्राहक सुखाय॥
मुंबई ग्राहक पंचायत
(गिरगांव विभाग)
माननीय श्रीयुत/श्रीमती
सप्रेम नमस्कार
गिरगांव विभागाचा १९वा वार्षिक मेळावा रविवार दि.
८ फेब्रुवारी २००९ या दिवशी दुपारी ४.३० ते ७.३० या
वेळात आयोजित केला आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्रीमती वसुंधरा पेंडसे-नाईक
भूषविणार आहेत.
प्रमुख पाहुणे आणि वक्ते म्हणून श्री. चंद्रशेखर कुलकर्णी
यांना निमंत्रित केले आहे.
या समारंभाला उपस्थित राहून आमच्या आनंदात
सहभागी व्हावे. ही नम्र विनंती, कळावे.
स्थळ
स्वस्तिक लीग सभागृह, इंपिरियल सिनेमागृहाजवळ
(दोन हत्तीजवळ) वि. प. रोड, गिरगांव, मुंबई. ४००००४
आपले स्नेहांकित
कार्याध्यक्ष कार्यवाह
श्री. भालचंद्र नाईक. श्रीम. शकुंतला म्हात्रे.
(९८२०६८२३२८) (९८६९०४८२३७)

Tuesday, January 6, 2009
मुंबई ग्राहक पंचायत विभागीय मेळावे
मुंबई ग्राहक पंचायत- विभागीय मेळावे- २००९
१) बोरीवली १०/०१/०९ ५ ते ८.३० जे.सी.महिन्द्र कल्चरल सेंटर, महिंद्र सोसायटी, पुष्टिपती गणेश मंदिराजवळ संत ज्ञानेश्वर मार्ग, बोरीवली (पू) मुंबई ४०००६६
२) अंधेरी- ११/०१/०९ ४ ते ८ अंधेरी स्पोर्टस कॉम्प्लेक्स सेमिनार हॉल, जयप्रकाश रोड, अंधेरी (प)
जोगेश्वरी वि.रा.देसाईरोडच्या सुरुवातीस कॉर्नरवर,मुंबई ४०००५८
३) दहिसर १८/०१/०९ विठ्ठल रखुमाई मंदिराजवळ, दहिसर (प)
४) मालाड २५/०१/०९ ३ ते ८ सुभद्रा सभागृह, १ला मजला, ब्राह्मणसभा, पोलीस स्टेशनसमोर, मालाड, मुंबई ४०००६४
५) वसई- २५/०१/०९ आर. पी. वाघ हायस्कूल, M.S.E.B. ऑफिससमोर, पारनाका, वसई.
नालासोपारा
६) दादर-माहीम-३१/०१/०९ ४.३० ते ८ वर्तक हॉल, चितळे पथ, दादर (प), मुंबई ४०००२८
वांद्रे.
७) गिरगांव ०८/०२/०९ ४.३० ते ७ स्वस्तिक लीग सभागृह, दोन हत्ती इंपिरियल सिनेमाजवळ, वि.प.रोड,
गिरगांव, मुंबई ४००००४

Subscribe to:
Posts (Atom)