Thursday, March 26, 2009

मासिकपत्रक एप्रिल २००९

॥श्री:॥
॥ ग्राहक हिताय ग्राहक सुखाय ॥ मासिक पत्रक एप्रिल २००९
मुंबई ग्राहक पंचायत
(गिरगांव विभाग)
ग्राहक बंधु-भगिनींनो,
सप्रेम नमस्कार.
• हिंदु नववर्षाच्या सर्वांना शुभेच्छा !
• व्याख्यान: बुधवार दि. १८ मार्च २००९ या दिवशी संध्या. ६.३० ते ८.०० या वेळांत आर्यन शाळेत श्री. पुरुषोत्तम दत्तात्रय काळे यांचे “सोन्याचांदीची खरेदी आणि ग्राहक” या विषयावर व्याख्यान झाले. ते उद्बोधक आणि माहितीपूर्ण होते. सोन्याचांदीची खरेदी करतांना कोणती काळजी घ्यावी हे त्यांनी रंजकतेने चांगले सांगितले. उपस्थिती २१ होती.
• व्याख्यान: बुधवार दि. १५ एप्रिल २००९ या दिवशी संध्या. ६.३० ते ८.०० या वेळांत आर्यन शाळेत डॉ. उल्हास गानू यांचे “जन औषधी योजना आणि ग्राहकहित” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. आपल्या मित्रमंडळींसह सर्वांनी अवश्य उपस्थित राहावे, ही विनंती.
• नवीन ग्राहक संघाचे स्वागत: मार्च २००९ पासून वाटपांत सहभागी झालेल्या “लालबागचा राजा” या नवीन ग्राहक संघाचे मन:पूर्वक स्वागत ! संघस्थापनेच्या बैठकीला श्री. भालचंद्र नाईक आणि श्री. अभय दातार यांनी संबोधित केले.
• जागतिक ग्राहकहक्क दिनानिमित्त ग्राहक भवन येथे झालेल्या कार्यक्रमास व इतर विभागांच्या मेळाव्यांना विभागाच्या वतीने श्रीम.शकुंतला म्हात्रे व श्रीम. नीलिमा नाईक उपस्थित राहिल्या.
• विभागाच्या साप्ताहिक बैठका नियमित झाल्या. गेल्या महिन्यांत कक्षात ४ तक्रारींना मार्गदर्शन करण्यात आले.
• सवलत योजना: आपल्या विभागांतील १७वी सवलत योजना जाहीर करतांना आनंद होत आहे. निरनिराळ्या स्वादाची आणि वेगवेगळ्या आकाराची सुकामेवा, खजूर, डेसिकेटेड कोकोनटयुक्त चॉकलेटस व संपूर्ण तेलविरहित टोमॅटो चटणी मिळेल. मागणी १ ते २० तारखेपर्यंत व वितरण २५ तारखेला श्री. रवींद्र सहस्रबुद्धे यांच्या घरून होईल. कृपया लाभ घेऊन अभिप्राय कळवावा. (संपर्क: २३८७२०६६)
• आपल्या विभागाच्या १६व्या सवलत योजनेला (नाश्त्याचे पौष्टिक पदार्थ) मार्च महिन्यांत चांगला प्रतिसाद मिळाला. रु. १९८२ ची मागणी आली. धन्यवाद इतरांनीही लाभ घ्यावा, ही विनंती.
• दरवर्षीप्रमाणे यावर्षीही होणाऱ्या आंबा वाटपाविषयी दि.१० एप्रिलला चौकशी करावी. (संपर्क: २३८७२०६६)
आपले नम्र

श्री. भालचंद्र नाईक. श्रीमती शकुंतला म्हात्रे.
कार्याध्यक्ष. कार्यवाह.
(दूरध्वनी: २३८६९२६०) (दूरध्वनी:२३८८८१८०)
आपल्या संकेतस्थळाला भेट द्या: http://mgpgirgaon.blogspot.com
प्रत-अ) अध्यक्षा सौ. वसुंधरा पेंडसे-नाईक. आ) ग्राहक संघ प्रमुख______________ इ) सहयोगी सदस्य________