Tuesday, January 27, 2009

ग्राहक सभासदांद्वारे मिळणाऱ्या सेवा

मुंबई ग्राहक पंचायत (गिरगांव विभाग)
ग्राहक सभासदाद्वारे मिळणाऱ्या विशिष्ट सेवा (रास्त दराने / विनामूल्य)

अनुक्रमांक सेवेचा प्रकार सभासदाचे नांव संघाचे नांव संपर्क क्रमांक
१ इलेक्ट्रिशियन श्री. अरुण जोशी निर्मिती २३८०१६०१
२ इलेक्ट्रिशियन श्री. शरद वा. शानभाग निर्मिती ९३२१२२०२८९
३ डेबिट/क्रेडिट कार्ड तक्रारी मार्गदर्शन श्री. अभय दातार निर्मिती २३८७०७६८
४ मोबाईल रिपेअरिंग सौ.वृषाली नाईक ओंकार २३८६९२६०
५ रक्ताच्या उपलब्धतेविषयी मार्गदर्शन श्री.अनिल शहा दुग्धशाळा वसाहत २४९६६४२४
६ थॅलेसेमिया आजाराविषयी व्याख्यान श्री.अनिल शहा दुग्धशाळा वसाहत २४९६६४२४
७ डेअरी दर्शन सवलतीच्या दरात श्री.एस.आर.पाटील दुग्धशाळा वसाहत ९८६९५६६४५१
८ सोने-चांदीच्या खरेदीसंबंधी तक्रारी मे.विष्णू सखाराम ज्वेलर्स ताराबाग शुक्रवारखेरीज२३८८४३३६
९ तक्रारीसंबंधात डॉ.सुरेश तोरणे सहयोगी सदस्य आर्यन शाळा बुधवारी ६.३०
१० वीजेच्या देयकाबाबत श्री.प्रभाकर नॆने ताराबाग आर्यन शाळा बुधवारी ६.३०
११ को.ऑ.सोसायटी-बिल्डर करारासंबंधी श्री.रवींद्र सहस्रबुद्धे ताराबाग आर्यन शाळा बुधवारी ६.३०
१२ नगरपालिकेसंबंधी श्री.रॉय नाना चौक आर्यन शाळा बुधवारी ६.३०
१३ गुंतवणुकीसंबंधी तक्रारी श्री.चवाथे खोताची वाडी आर्यन शाळा बुधवारी ६.३०
अनुक्रमांक ३,५,६,८,९,१०,११,१२,१३ मार्गदर्शन सेवा विनामूल्य आहेत.

मासिक पत्रक फेब्रुवारी २००९

॥श्री:॥
॥ ग्राहक हिताय ग्राहक सुखाय ॥ मासिक पत्रक फेब्रुवारी २००९
मुंबई ग्राहक पंचायत
(गिरगांव विभाग)
ग्राहक बंधु-भगिनींनो,
सप्रेम नमस्कार.
• व्याख्यान: नियोजित वक्ते घरगुती अडचणींमुळे येऊं न शकल्यामुळे बुधवार दि. २१/०१/२००९ या दिवशी संध्या. ६.३० ते ८.०० या वेळांत आर्यन शाळा येथे ““रुग्णसेवा आणि ग्राहक” या विषयावर श्री. प्रभाकर नेने यांनी दिलेल्या मसुद्याच्या आधारे उपस्थित सभासदांनी चर्चा केली.
• संघप्रमुख शिबिर : रविवार दि. ११ जाने.२००९ या दिवशी दुपारी ३.३० ते ७.०० या वेळात गिरगांव विभागांतील संघप्रमुखांचे शिबिर स्वस्तिक लीग येथे झाले. या शिबिराला विभागीय अध्यक्ष सौ. वसुंधरा पेंडसे-नाईक उपस्थित होत्या. संघप्रमुख,संघसदस्य आणि अन्य मिळून ३५ उपस्थिती होती. या सभेला श्री. कमलाकर पेंडसे, सौ. वसुंधरा देवधर, सौ.कविता कुलकर्णी व सौ.नीलिमा नाईक यांनी संबोधित केले.
• व्याख्यान: बुधवार दि. १८ फेब्रुवारी २००९ या दिवशी संध्या. ६.३० ते ८.०० या वेळांत आर्यन शाळेत “शेअरबाजार आणि ग्राहक” या विषयावर श्री.चवाथे यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. आपण सर्वांनी मित्रमंडळींसह अवश्य उपस्थित रहावे.
• विभागीय मेळावा: रविवार दि. ८ फेब्रु. २००९ या दिवशी दुपारी ४.३० ते ७.३० या वेळात गिरगांव विभागांतील सर्व संघसदस्यांचा वार्षिक मेळावा स्वस्तिक लीग सभागृह, वि.प.रोड (दोन हत्तीजवळ) येथे होणार आहे. बऱ्याच संघांनी शुल्क पाठविले आहे; त्यांचे मन:पूर्वक आभार. ज्यांनी अजून पाठविले नसेल त्यांनी कृपया प्रति सदस्य शुल्क रु. १५ गोळा करून संघश: श्री. सहस्रबुद्धे यांना फेब्रुवारीच्या बिलाच्यावेळी द्यावेत व कार्यक्रम यशस्वी करण्यास विभागाला मदत करावी.
• विभागाच्या साप्ताहिक बैठका नियमित झाल्या. गेल्या महिन्यांत कक्षात आलेल्या ग्राहकांना तक्रारीसंबंधात मार्गदर्शन करण्यांत आले. कक्षांत काम करू इच्छिणाऱ्यांनी कृपया संपर्क साधावा ही विनंती.
• या मासिक पत्रकाबरोबर मेळाव्याचे आमंत्रण, वार्षिक ताळेबंद आणि विशिष्ट सेवा माहितीपत्रक पाठवीत आहोत. कृपया आपल्या संघांतील सर्व सदस्यांना त्यासंबंधी माहिती द्यावी.

आपले नम्र

श्री. भालचंद्र नाईक. श्रीमती शकुंतला म्हात्रे.
कार्याध्यक्ष. कार्यवाह.
(दूरध्वनी: २३८६९२६०) (दूरध्वनी:२३८८८१८०)
आपल्या संकेतस्थळाला भेट द्या: http://mgpgirgaon.blogspot.com
प्रत-अ) अध्यक्षा सौ. वसुंधरा पेंडसे-नाईक.
आ) ग्राहक संघ प्रमुख__________________
इ) सहयोगी सदस्य___________________

Monday, January 12, 2009

निमंत्रण गिरगांव मेळावा

॥श्री:॥
॥ग्राहक हिताय ग्राहक सुखाय॥
मुंबई ग्राहक पंचायत
(गिरगांव विभाग)

माननीय श्रीयुत/श्रीमती

सप्रेम नमस्कार
गिरगांव विभागाचा १९वा वार्षिक मेळावा रविवार दि.
८ फेब्रुवारी २००९ या दिवशी दुपारी ४.३० ते ७.३० या
वेळात आयोजित केला आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्रीमती वसुंधरा पेंडसे-नाईक
भूषविणार आहेत.
प्रमुख पाहुणे आणि वक्ते म्हणून श्री. चंद्रशेखर कुलकर्णी
यांना निमंत्रित केले आहे.

या समारंभाला उपस्थित राहून आमच्या आनंदात
सहभागी व्हावे. ही नम्र विनंती, कळावे.

स्थळ
स्वस्तिक लीग सभागृह, इंपिरियल सिनेमागृहाजवळ
(दोन हत्तीजवळ) वि. प. रोड, गिरगांव, मुंबई. ४००००४

आपले स्नेहांकित
कार्याध्यक्ष कार्यवाह
श्री. भालचंद्र नाईक. श्रीम. शकुंतला म्हात्रे.
(९८२०६८२३२८) (९८६९०४८२३७)

Tuesday, January 6, 2009

मुंबई ग्राहक पंचायत विभागीय मेळावे

मुंबई ग्राहक पंचायत- विभागीय मेळावे- २००९
१) बोरीवली १०/०१/०९ ५ ते ८.३० जे.सी.महिन्द्र कल्चरल सेंटर, महिंद्र सोसायटी, पुष्टिपती गणेश मंदिराजवळ संत ज्ञानेश्वर मार्ग, बोरीवली (पू) मुंबई ४०००६६
२) अंधेरी- ११/०१/०९ ४ ते ८ अंधेरी स्पोर्टस कॉम्प्लेक्स सेमिनार हॉल, जयप्रकाश रोड, अंधेरी (प)
जोगेश्वरी वि.रा.देसाईरोडच्या सुरुवातीस कॉर्नरवर,मुंबई ४०००५८
३) दहिसर १८/०१/०९ विठ्ठल रखुमाई मंदिराजवळ, दहिसर (प)
४) मालाड २५/०१/०९ ३ ते ८ सुभद्रा सभागृह, १ला मजला, ब्राह्मणसभा, पोलीस स्टेशनसमोर, मालाड, मुंबई ४०००६४
५) वसई- २५/०१/०९ आर. पी. वाघ हायस्कूल, M.S.E.B. ऑफिससमोर, पारनाका, वसई.
नालासोपारा
६) दादर-माहीम-३१/०१/०९ ४.३० ते ८ वर्तक हॉल, चितळे पथ, दादर (प), मुंबई ४०००२८
वांद्रे.
७) गिरगांव ०८/०२/०९ ४.३० ते ७ स्वस्तिक लीग सभागृह, दोन हत्ती इंपिरियल सिनेमाजवळ, वि.प.रोड,
गिरगांव, मुंबई ४००००४