Sunday, February 8, 2009

गिरगांव विभागाचा १९वा वार्षिक मॆळावा


॥श्री:॥
मुंबई ग्राहक पंचायत
(गिरगांव विभाग)
मुंबई ग्राहक पंचायतीच्या गिरगांव विभागाचा १९वा वार्षिक मॆळावा रविवार दि. ८ फेब्रुवारी २००९ या दिवशी दु. ४.३०ते ७.१० या वेळांत स्वस्तिक लीग सभागृह, गिरगांव येथे श्रीम. वसुंधरा पेंडसे नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झाला.
या मेळाव्यास सुमारे १०० सदस्य उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे म्हणून लोकसत्ताचे उप निवासी संपादक श्री. चंद्रशेखर कुलकर्णी उपस्थित होते.


२६ नोव्हेंबर २००८ या दिवशी झालेल्या दहशती हल्याच्या वेळी अतुलनीय शौर्य दाखविणाऱ्या चमूतील राष्ट्रपती पदक विजेत्या तीन वीरांना या मेळाव्यास विशेष आमंत्रित केले होते. त्यापैकी श्री. संजय गोविलकर राष्ट्रपतींच्या मुंबईतील कार्यक्रमास उपस्थित राहणे आवश्यक असल्यामुळे या समारंभाला उपस्थित राहू शकले नाहीत. श्री. हेमंत बावधनकर व श्री. भास्कर कदम उपस्थित होते त्यांचा विभागाच्यावतीने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमापूर्वी शहीदांना आणि विभागातील दिवंगत कार्यकर्त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.


प्रमुख पाहुणे श्री.चंद्रशेखर कुलकर्णी यांच्या हस्ते गणेशपूजन आणि दीपप्रज्वलन झाल्यानंतर श्रीमती स्मिता घारपुरे यांच्या ईशस्तवनाने कार्यक्रमाला सुरुचात झाली.
श्रीमती सविता चवाथे यांनी सूत्रसंचालन केले.
कु.मीनल साठे यांनी कवितावाचन केले.


त्यानंतर “रंग कवितेचे” हा बहारदार कार्यक्रम श्री.लळित यांनी सादर केला.
श्री. अभय दातार यांनी संबंधितांचे आभार मानले.

No comments: