मुंबई ग्राहक पंचायत गिरगांव विभागाच्या कार्याध्यक्षपदी श्री. अभय दातार यांची नियुक्ती बुधवार १५ एप्रिल २००९ या दिवशी आर्यन शाळेत भरलेल्या विभागाच्या साप्ताहिक सभेत सर्वानुमते करण्यांत आली.
श्री.अभय दातार यांनी पदग्रहण केले आणि अध्यक्षपदाची सूत्रे श्री.भालचंद्र नाईक यांच्याकडून स्वीकारली.
श्री.अभय दातार यांचे अभिनंदन!
त्याच दिवशी श्रीम.सविता चवाथे यांची सहकार्यवाह म्हणून नेमणूक करण्यांत आली. त्या विद्यमान कार्यवाह श्रीम.शकुंतला म्हात्रे यांच्याबरोबर विभागाचे काम करतील. श्रीम.चवाथे यांनी जवाबदारी स्वीकारली.
श्रीम.सविता चवाथे यांचे अभिनंदन!
Sunday, May 10, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment