॥श्री:॥
॥ ग्राहक हिताय ग्राहक सुखाय ॥ मासिक पत्रक जानेवारी २००९
मुंबई ग्राहक पंचायत
(गिरगांव विभाग)
ग्राहक बंधु-भगिनींनो,
सप्रेम नमस्कार.
• व्याख्यान: नियोजित वक्ते घरगुती अडचणींमुळे येऊं न शकल्यामुळे बुधवार दि. १७/१२/२००८ या दिवशी संध्या. ६.३० ते ८.०० या वेळांत आर्यन शाळा येथे “वीजटंचाई--आपण काय करूं शकतो?” या विषयावर श्री. अजित शेणाय यांनी दिलेल्या मसुद्याच्या आधारे उपस्थित सभासदांनी चर्चा केली.
• संघप्रमुख शिबिर : रविवार दि. ११ जाने.२००९ या दिवशी दुपारी ३.३० ते ७.०० या वेळात गिरगांव विभागांतील संघप्रमुखांचे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सर्व संघप्रमुखांनी याची नोंद घ्यावी व अवश्य उपस्थित राहावे, ही विनंती. उपस्थिती आवश्यक आहे. शिबिर स्वस्तिक लीग सभागृह, (इम्पिरियल सिनेमा, दोन हत्तीजवळ), वि.प. रोड, गिरगांव, मुंबई ४०० ००४ येथे आहे.
• विभागीय वाटप : दरवर्षीप्रमाणे या वर्षीही संक्रांतीसाठी उत्तम दर्जाच्या पालिश तिळाचे तीळगूळ लाडू अर्ध्या किलोला रु. ६१ या भावाने मिळतील. (बाजारांत MRP १४० रु. प्रति किलो आहे.) मागणीची अंतिम तारीख १० जाने. २००९ व वाटप १३ जाने. २००९ दु. ४.०० वा होईल. संपर्क: २३८७२०६६ श्री.सहस्रबुद्धे.
• व्याख्यान: बुधवार दि. २१ जाने. या दिवशी संध्या. ६.३० ते ८.०० या वेळांत आर्यन शाळेत “रुग्णसेवा आणि ग्राहक” या विषयावर श्री. प्रभाकर नेने (कार्यवाह, ब्राह्मणसभा रुग्णालय.) यांचे व्याख्यान होणार आहे. सर्व सभासदांनी आपल्या मित्रमंडळींसह उपस्थित राहून व्याख्यानाचा लाभ घ्यावा, ही विनंती.
• विभागीय मेळावा: रविवार दि. ८ फेब्रु. २००९ या दिवशी दुपारी ४.३० ते ७.३० या वेळात गिरगांव विभागांतील सर्व संघसदस्यांचा वार्षिक मेळावा स्वस्तिक लीग सभागृह, वि.प.रोड (दोन हत्तीजवळ) येथे होणार आहे. प्रति सदस्य शुल्क रु. १५ गोळा करून संघश: श्री. सहस्रबुद्धे यांना जानेवारीच्या बिलाच्यावेळी द्यावेत व कार्यक्रम यशस्वी करण्यास विभागाला मदत करावी.
• विभागाच्या साप्ताहिक बैठका नियमित झाल्या. गेल्या महिन्यांत ४ ग्राहकांना तक्रारीसंबंधात मार्गदर्शन करण्यांत आले. कक्षांत काम करू इच्छिणाऱ्यांनी कृपया संपर्क साधावा ही विनंती.
नववर्ष सर्वांना शांततेचे, सुखाचे आणि समृद्धीचे जावो. कळावे, लोभ वॄध्दींगत व्हावा.
आपले नम्र
श्री. भालचंद्र नाईक. श्रीमती शकुंतला म्हात्रे.
कार्याध्यक्ष. कार्यवाह.
(दूरध्वनी: २३८६९२६०) (दूरध्वनी:२३८८८१८०)
आपल्या संकेतस्थळाला भेट द्या: http://mgpgirgaon.blogspot.com
प्रत-अ) अध्यक्षा सौ. वसुंधरा पेंडसे-नाईक.
आ) ग्राहक संघ प्रमुख__________________
इ) सहयोगी सदस्य___________________
Friday, December 26, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment