Friday, June 27, 2008

मासिक पत्रक जुलै २००८

॥श्री:॥
॥ ग्राहक हिताय ग्राहक सुखाय ॥ मासिक पत्रक जुलै २००८
मुंबई ग्राहक पंचायत
(गिरगांव विभाग)
ग्राहक बंधु-भगिनींनो,
सप्रेम नमस्कार.
१) आपल्या विभागातील १०वी/१२वी यावर्षी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचा कौतुकसोहळा
बुधवार दि. १६ जुलै २००८ यादिवशी आर्यन शाळेत संध्या. ६.३० ते ८.०० या वेळात आयोजित केलेला आहे.
उत्तीर्ण विद्यार्थी-विद्यार्थिनींनी कृपया आपली माहिती दि. १३ जुलैच्या आत कार्यवाह श्रीम. शकुंतला म्हात्रे (२३८८८१८०) किंवा श्री. रवींद्र सहस्रबुद्धे(२३८७२०६६) यांना कळ्वावी. संपूर्ण नांव, संपर्क क्र.,ग्राहक संघाचे नांव, संघ क्र.,शाळा/महाविद्यालयाचे नांव ही माहिती व गुणपत्रिकेची प्रत आर्यन शाळेत २ जुलै किंवा ९ जुलै या दिवशीही संध्या. ६.३० ते ८.०० या वेळात देता येईल. निर्मिती ग्राहकसंघातील ज्येष्ट सदस्या श्रीम. प्रमिला विष्णू दातार यांच्याहस्ते कौतुकभेट देण्यात येईल. श्री. रामचंद्र केशव जोशी यांनी या समारंभासाठी रु.१०१ देणगी दिली आहे. दहावी मराठीत सर्वात जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यास/विद्यार्थिनीस श्री. रवींद्र सहस्रबुद्धे रु.५१देणार आहेत. अन्य इच्छुक दात्यांनी कार्यक्रमासाठी देणग्या दिल्यास विभाग त्यांचाही आनंदाने साभार स्वीकार करील.
२)ओळखपत्राद्वारे खरेदी योजनेत “ज्योत्स्ना प्रकाशन” मॊहन बिल्डिंग (खरेदीवर २०% सूट) व रामचंद्र केशव आणि कं.(दागिन्यांच्या घडणावळीवर १५% सूट) यानी भाग घेतला आहे. सदस्यांनी त्याचा लाभ घ्यावा. दोघांचा पत्ता: जगन्नाथ शंकरशेट मार्ग, गिरगांव, मुंबई ४०० ००४ आहे.
३) श्री. मिलिंद कचरे यांची तक्रार श्री. सहस्रबुद्धे यांच्या प्रयत्नाने समाधानकारकरित्या सुटली व त्यांना एअर कंडिशनरचे रु. १६९९० परत मिळाले. हे नमूद करणारे आभाराचे पत्र त्यांनी विभागाला पाठविले आहे.
४) आपल्या विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्या व अभिप्राय कळवा ही विनंती. http://mgpgirgaon.blogspot.com (हा ब्लॉग मराठी आहे: “मुंबई ग्राहक पंचायत गिरगांव”)
५) आंबा वितरण उपक्रमातून विभागाला रु. ५५५ मिळाले. श्री. सहस्रबुद्धे यांचे अभिनंदन!
६) श्री. शरद परांजपे यांच्या व्याख्यानाला २४ जण उपस्थित होते. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
आपला E-mail bhalchandra.naik@rediffmail.com या पत्यावर कळवावा.
कळावे, लोभ वॄध्दींगत व्हावा.


आपले नम्र
श्री. भालचंद्र नाईक. श्रीमती शकुंतला म्हात्रे.
कार्याध्यक्ष. कार्यवाह.
(दूरध्वनी: २३८६९२६०) (दूरध्वनी:२३८८८१८०)

अ) ग्राहक संघ प्रमुख______________
आ) सहयोगी सदस्य
इ) अध्यक्षा सौ. वसुंधरा पेंडसे-नाईक.

3 comments:

ABHAY DATAR said...

The ceremony held at Aryan High School, on 16th July, 2008 for SSC and HSC students was really nice. Informative feedback was given by the students. An untiring speech by Shri Bhalchandra Naik was definitely a guiding one. His speech was a flow of information, encouragement and assuring.

Not only the students but their parents and other participants enjoyed it.

Abhay Datar

Bhalchandra A Naik said...

धन्यवाद.

भालचंद्र नाईक.

Bhalchandra A Naik said...

धन्यवाद.

भालचंद्र नाईक.